सरकारची भूमिका ओबीसीविरोधी; विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला.
जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला. केवळ जनगणनेत जात लिहिली गेल्याने अर्धी लढाई जिंकली असे म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले. ‘जात लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी जिंकली? हे मला कळलं नाही.

जर त्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असता, तर त्यातून १०० टक्के यश मिळाले असते’ असे वडेट्टीवार यांनी म्हटले. जात लिहिण्याबरोबरच त्यातील विविध पोटजाती आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातींची नोंद कशा पद्धतीने केली जाते, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी उपसमितीच्या बैठका नियमित होत नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘याचा अर्थ असा आहे की सरकार ओबीसीच्या प्रश्नासंबंधी अनुकूल नाही. या सरकारची भूमिका ओबीसीविरोधी आहे, हे आता स्पष्ट झाले आहे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच ओबीसी आरक्षण आणि जातनिहाय आकडेवारीचा मुद्दाही आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारवर दबाव टाका
ओबीसींच्या प्रश्नासाठी आंदोलन करणा-यांनी सरकारवर दबाव आणून जातनिहाय नोंदीमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याची मागणी करावी, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

जरांगे काय करतात, सरकार पाहील
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील काय करतात, कोणाला बोलवतात, काय बैठक घेतात, ते सरकार बघेल आणि जरांगे बघतील. आम्हाला त्यात कशाला पाडायचं? असा सवाल त्यांनी केला. मात्र, ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका कायम ठेवली.

ओबीसीला संपवण्याचा विडा उचलला
ओबीसी समाजाच्या वाट्याला काहीच मिळत नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आमच्यावर अन्याय करण्याचा विडा उचललाच आहे. ओबीसीला संपवण्याचा विडा उचलला आहे. ओबीसीच्या वाट्याला काही मिळत नाही असे ते म्हणाले. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सरकारकडून गांभीर्याने विचार होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

ओबीसी उपसमितीच्या बैठका नियमित घ्या
ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या उपसमितीचे अध्यक्ष असल्याचा संदर्भ देत, आतापर्यंत केवळ दोन बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठका नियमितपणे घेण्याची मागणी आपण केली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. दर महिन्याला एक बैठक घ्या आणि ओबीसी नेत्यांनाही बोलवा. त्यांच्या काही समस्या असतील, सूचना असतील तर त्या बैठकीत मांडण्याची संधी द्या अशी मागणी त्यांनी केली. मात्र, सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठवाड्यातील ओबीसी प्रमाणपत्रांवरही प्रश्न
ओबीसी प्रमाणपत्रांच्या मुद्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नवीन प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा दावा केला. ‘मराठवाड्यामध्ये ८५ टक्के नवीन प्रमाणपत्र ं घेणारे…’ असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news