लातूर : प्रतिनिधी
गेल्या १०वर्षांत देशात नीटसह तब्बल १५२ परीक्षांचे पेपर फुटले आहेत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या अन्यायाविरोधात दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणा-या हुकूमशाही शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. या सर्व घडामोडीचा विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सरकारने आता विद्यार्थ्यांचे ऐकावे, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर येथे विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने दि. २४ जुलै रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या भव्य एल्गार मोर्चामध्ये सहभागी होऊन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांच्या भव्य एल्गार मोर्चा शहरातील ट्युशन एरियामधील अष्टविनायक मंदिरापासून निघाला. सीतारामनगर, नंदी स्टॉप, औसा रोड मार्गे हा एल्गार मोर्चा जिल्हा क्रीडा संकुलातील शहीद स्मारक परिसरात पोहंचला. या मोर्चाचा समारोप जिल्हा क्रीडा संकुलात झाला. यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. छात्रों की गूंज… विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि ट्वेन्टी वन अग्रो लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती झाला.
विद्यार्थ्यांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब शासनकर्त्यांना द्यावा लागेल
यावेळी बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हणाले, देशातील शिक्षण व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, सध्या गुणवंतांना डावलून पैसेवाल्यांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश आणि नोक-या मिळत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. सर्व पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. विद्यार्थ्यांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब शासनकर्त्यांना द्यावाच लागेल.
या मोर्चात ‘आवाज विद्यार्थ्याचा, भारताच्या उज्वल भवितव्याचा’, ‘शिक्षण वाचवा भविष्य वाचवा’, ‘पेपरफुटीमुक्त भारतासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’, पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी, विद्यार्थ्यांचा न्याय देशाचा विश्वास’, अशा घोषणाचे फलक मोर्चात होते. कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) माध्यमातून अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली देशातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरण, परीक्षांमधील हेराफेरी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृहनेते विजयकुमार साबदे, लातूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश देशमुख, लातूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विष्णुदास धायगुडे, एन.एस.यू.आय. लातूर जिल्हा अध्यक्ष रोहित बिराजदार, एन.एस.यू.आय. लातूर शहर अध्यक्ष व्यंकटेश झिपरे, परिवहन समितीचे सभापती फैजल कायमखानी, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन किरण जाधव, व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी महापौर दीपक सुळ, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, संगीता मोळवणे, मारुती पांडे, अनिल चव्हाण, कल्याण पाटील, संजय ओहाळ, अभिजीत इंगळे, गणेश कांबळे, अकबर माडजे, भालचंद्र येडवे, सतीश साळुंखे, श्रीशैल गडगडे, यशवंत वाडीकर, मनोज चिखले, कविता वाडीकर, प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण कांबळे, आशाताई भिसे, सोनालीताई थोरमोठे-पाटील, विद्याताई पाटील, डॉ. दिनेश नवगिरे, एकनाथ पाटील, आसिफ बागवान, सपना किसवे, पद्माकर उगिले, अजित नाईकवाडे, सुवर्णा जगताप, युनूस शेख, प्रा. सुधीर आणवले, अभिषेक पतंगे, पप्पू देशमुख, सत्यवान कांबळे, राम स्वामी, राजश्री देशमुख, इसरार सगरे, सोनू डगवाले, भालचंद्र सोनकांबळे, गोटू यादव, अजित निंबाळकर, सुरेश चव्हाण, संजय ओहाळ, पवन सोलंकर, पवनकुमार गायकवाड, पवन जाधव, आतिश चिकटे, सचिन पाटील, महेश बिडवे, काशिनाथ जोंधळे, तबरेज तांबोळी, मनोज थोरात, विकास कांबळे, व्यंकटेश पुरी, उमेश बेद्रे, प्रा. बसवराज धरणे, कांचन अजनीकर, सुदर्शन बिरादार, लक्ष्मण मोरे, प्रताप पाटील, रामदास पवार, प्रा. राजेंद्र शिंदे, अबू मनियार, डॉ. अरविंद भातांबे्र, विजय टाकेकर, अजित माने, चक्रधर शेळके, शहाबाद खान, तानाजी फुटाणे, डॉ. नागेश्वरी केंद्रे, सईताई गोरे, दिपाली आदमाने, योगिता शिंदे, उषा पाटील, अल्लाबक्ष शेख, अॅड. देविदास बोरुळे पाटील, अविनाश बट्टेवार, अॅड. अंगद गायकवाड, राजकुमार पाटील, विलास भोसले, प्रा. गजेंद्र तरंगे, बापू चव्हाण, रमेश सूर्यवंशी, सत्तार शेख, मुख्तार शेख, रफिक सय्यद आदींसह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी, लातूर शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय. चे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व आदरणीय नगरसेवक, विद्यार्थी, पालक आणि मोठ्या संख्येने लातूरकर नागरिक उपस्थित होते.
‘सीजेपी’च्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या प्रमुख मागण्या
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि परीक्षा प्रक्रियेतील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आणि इतर प्रमुख स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी व भ्रष्टाचाराची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासह शांततापूर्ण आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर दिल्ली व इतर ठिकाणी झालेली पोलीस कारवाई आणि बळाचा वापर थांबवून विद्यार्थ्यांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत.
नीट पेपरफुटीमुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या विदयार्थ्याच्या कुटूंबीयांना १ कोटीची मदत करावी या सर्व मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
आंदोलकांना कायमचे संपवून टाकणारी निर्दयी व्यवस्था होती
दिल्लीतील घटनेचा निषेध करताना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा-या युवकांवर आणि विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी गेलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेली मारहाण अत्यंत अमानुष होती. ही केवळ आंदोलन चिरडण्याची पद्धत नसून, आंदोलकांना कायमचे संपवून टाकणारी निर्दयी व्यवस्था होती. देशातील लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचा हा सत्ताधा-यांचा प्रयत्न आहे.
काँग्रेस पक्षाचा संघर्ष सुरूच राहील
शिक्षण आणि नोकरभरतीतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आणि बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र संघर्ष सुरूच राहील, असा इशारा देत विरोधी पक्ष म्हणून तरुणांच्या हक्कासाठी आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी दिली.
















