सरकार काय प्रायश्चित घेणार?; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक आहे. ज्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा सुरक्षेच्या अभावामुळे जीव जाणे हा आरोग्य व्यवस्थेचा गंभीर निष्काळजीपणा आहे. या निष्पाप बालकांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. अमरावतीमधील हे प्रकरण कुठेतरी भ्रष्टाचाराशी निगडित आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या घटनेचे सरकार काय प्रायश्चित्त घेणार? असा सवाल काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत, हे आज जनतेला माहितीच नाही. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुख्यमंर्त्यांनी आता तरी पूर्णवेळ गृहमंत्री दिला पाहिजे. या जळीतकांडातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. मुख्य आरोपींना सोडून भलत्याच निष्पापांना यात अडकवले जाण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, पुन्हा कोणत्याही निष्पाप बालकाचा जीव जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट आणि वैद्यकीय उपकरणांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मृत चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. तसेच, जखमी बालके लवकरात लवकर बरी होऊन आपल्या आईच्या कुशीत परतावीत, हीच प्रार्थना, अशा शब्दांत सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

महिला-बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात एकामागून एक गंभीर घटना घडत आहेत. राहुल गांधी यांनी चार दिवसांपूर्वी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता; मात्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून हात झटकले. आज पुन्हा एकदा महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

माहिती तातडीने समोर यावी
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, रुग्णालयात हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरणासारखी ‘एसआयटी’ नेमून अहवालच गायब होईल, असे इथे होऊ नये. सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? कुठे घोटाळा झाला आहे का? आणि रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’ झाले होते का? या सर्वांची माहिती तातडीने समोर आली पाहिजे. सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याचेच यावरून स्पष्ट होते, असेही सपकाळ म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news