नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आज धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर वस्तू फेकली, सुनावणीदरम्यान एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला. वृत्तानुसार, त्या व्यक्तीने न्यायालयात घोषणाबाजी देखील केली. नंतर सुरक्षा कर्मचा-यांनी त्याला बाहेर काढले, ज्यामुळे काही काळ न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आला.
‘लाईव्ह लॉ’ वेबसाइटनुसार, न्यायालयात उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, संबंधिताने ‘हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’, अशी घोषणा देत होता. काही प्रत्यक्षदर्शींनी वेबसाइटला सांगितले की, संबंधित व्यक्तीने सरन्यायाधीशांवर ‘बूट’ फेकण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी सांगितले की ,सरन्यायाधीशांवर कागदाचा गुंडाळा फेकण्यात आला. असाही दावा करण्यात आला की तो माणूस वकिलाच्या पोशाखात होता.

