लातूर : प्रतिनिधी
सार्वजनिक जीवनात कार्य करत असताना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वेगवेगळया ठिकाणी काम करण्याची संधी द्यायची, असा माझा प्रयत्न असतो. त्यामुळें ज्यांना संधी मिळाली त्यांनी आगामी होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जुन्या, नव्या पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांना सोबत घेवुन आपण कार्य करावे त्यासाठी आतापासून पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
आशियाना बंगल्यावर दि. २१ जून रोजी लातूर तालुक्यातील चिकलठाना येथील नरसिंग इंगळे यांची रेणा साखर कारखान्याचे स्विकृत संचालक पदावर व रेणापूर तालुक्यांतील डिगोळ देशमुख येथील डॉ. उमाकांत देशमुख यांची तक्रार निवारण समिती सदस्य तर कामगार प्रतिनिधी म्हणून सिंदगाव तालुका रेणापुर येथील अण्णासाहेब भगवान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल लातूर व रेणापूर तालुक्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, सोसायटीचे चेअरमन, सरपंच, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळीं ते बोलत होते.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, माधव गंभिरे, केशव गंभिरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे संचालक, रेणाचे संचालक मंडळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते