18.7 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeमनोरंजनसलमान खान-तमन्ना भाटियाचा रोमँटिक परफॉर्मन्स

सलमान खान-तमन्ना भाटियाचा रोमँटिक परफॉर्मन्स

मुंबई : प्रतिनिधी
कतारची राजधानी दोहा येथे ही दबंग रिलोडेड टूर आहे. सलमानसोबत तमन्ना भाटिया, जॅकलीन फर्नांडिस, सुनील ग्रोव्हर, मनीष पॉल, स्टेबिन बेन हे देखील या टूरवर आहेत. दोहा येथे कलाकारांचे परफॉर्मन्स आता व्हायरल होत आहेत. विशेषत: सलमान खान आणि तमन्ना भाटियाची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. दोघांनी एकत्र सिनेमा करावा असे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

दोहा येथे परफॉर्मन्सवेळी सलमान खान आणि तमन्ना भाटियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमानच्या सुपरहिट गाण्यांवर सर्वांनी परफॉर्म केलं. सलमानने स्वत: ‘ओ ओ जाने जा ना’, ‘स्वॅग से स्वागत’, ‘दीदी तेरा देवर दीवाना’, ‘कभी तू छलिया लगता है’, ‘जीने के है चार दिन’ या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म केला. प्रेक्षकही त्याच्यासोबत नाचत होते. जॅकलीन फर्नांडिसनेही आपला परफॉर्मन्स दिला.

दरम्यान सलमान आणि तमन्नाने ‘दिल दिया गयां’ या रोमँटिक गाण्यावर डान्स केला. त्यात त्यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खूपच खुश झाले. लाल आऊटफिटमध्ये तमन्ना एकदम हॉट दिसत आहे. तर ब्लॅक सूट-बूटमध्ये सलमान खान डॅशिंग आणि हँडसम दिसत आहे. अनेकांना कतरिना कैफचीच आठवण आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR