रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांनी माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, ‘रेणापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन नगरसेवकांनी एकसंघपणे काम करावे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक कारभार करणे हीच खरी लोकसेवेची दिशा आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि विकासात्मक धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे, सचिन पाटील, गोविंद पाटील, प्रदिप माने, मतीन अली सय्यद संभाजी रेड्डी, प्रेमनाथ आकनगिरे, नूतन नगरसेवक सुजाता सौदागर, मिनाक्षी पनुरे, राजश्री शिंदे, गजेंद्र चव्हाण, सचिन मोटेगावकर, यांच्यासह शिवाजी आकनगिरे , कमलाकर आकनगिरे, गणेश सौदागर, भुषण पनुरे, संतोष शिंदे, केदार हलकुडे, प्रकाश सूर्यवंशी, नितीन मोटेगावकर, अभिजीत काळे, सुरज वंगाटे आदी उपस्थित होते.

