27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeमहाराष्ट्रसांगलीत ‘मुळशी पॅटर्न’ हत्याकांड

सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’ हत्याकांड

वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सपासप वार

सांगली : सांगली जिल्ह्यात ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मुळशी पॅटर्न दुहेरी हत्याकांडाचा प्रकार घडल्याने जिल्हा हादरून गेला आहे. दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
या हल्ल्यात दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हे जागीच ठार झाले. याचवेळी मोहितेंच्या हत्येचा बदला त्यांच्या पुतण्याने घेतला आहे. मोहिते यांच्या पुतण्याने हल्लेखोरावर पलटवार करत त्याचा देखील खात्मा केला.

सांगली जिल्ह्यात मध्यरात्री डबल मर्डर झाल्याने खळबळ उडाली आहे. तर गारपीर परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हल्ल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम मोहितेवर शा-या ऊर्फ शाब्या शाहरूख शेख याने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर उत्तमच्या पुतण्याने प्रत्युत्तरात शेखवर हल्ला केला असून, शेखही ठार झाला आहे.

मोहिते व शेख यांच्यातील जुन्या वादामुळे हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. तर ही घटना पूर्ववैमनस्य, सुपारी की इतर कोणत्या कारणाने झाला आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सांगली पोलिसांची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR