26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्र‘सागर’ बंगल्यावर घडामोडींना वेग

‘सागर’ बंगल्यावर घडामोडींना वेग

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास काही कालावधी शिल्लक राहिला आहे. दरम्यान राज्यात निकाल जाहीर होण्याआधीच वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर नेत्यांची वर्दळ वाढली आहे. बहुमत न मिळाल्यास महायुतीने प्लॅन बी देखील तयार केला असल्याचे समजते आहे.

विधानसभा निकालाआधी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलवल्याचे समजते आहे. भाजपचे अनेक मोठे नेते या बैठकीला हजर असल्याचे समजते आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना एकत्रित करण्यासाठी किंवा पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. तर, मनसेचे बाळा नांदगावकर यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली आहे.

मनसेची भूमिका ठरणार महत्त्वाची
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. तसेच मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. सध्या समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा किंगमेकर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR