27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeमहाराष्ट्रसाता-यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण

साता-यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण

सातारा : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकींसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानापूर्वी साता-यात मोठा राजकीय राडा झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. साता-यातील पाल जिल्हा परिषद गटातील ही घटना आहे.या प्रकरणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला आहे. या घटनेमुळे साता-यात राजकारण तापले आहे.

भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाबासाहेब चोरेकर यांचे नातू बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली. देवदर्शनाहून परतताना ही मारहाण करण्यात आली. पाल जिल्हा परिषद गटात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे.

बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना रस्त्यामध्ये गाठत मारहाण करण्यात आली. कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या घटनेनंतर बाळासाहेब साळुंखे चोरेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी उंब्रज पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR