सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको

नाशिक : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवली, ज्याला ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला आहे. या जीआरच्या वैधतेबद्दल विचारले असता, शरद पवार म्हणाले की, एक समिती एका मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तर दुसरी दुस-याच्या अध्यक्षतेखाली आहे. सरकारने असे करणे योग्य नाही. सरकार कुठल्याही जाती-धर्माचे नाही, सरकार सर्वांचे असावे, सरकार व्यापक असावे. कोणतीही कमिटी एका जातीची करू नका, समाजाची करा. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको, असा सल्लाही शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी केला. मात्र, याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे.

नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, इथल्या सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असे चित्र दिसत आहे. माझ्या मते हे एक प्रकारचे आव्हान आहे. काय वाटेल ती किंमत द्यायची असेल ती देऊ पण महाराष्ट्र एकसंध कसा राहील, महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र कसे ठेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाण साहेबांनी, जो दादासाहेब गायकवाड यांनी आणि त्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला होता तो पुढे नेण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी तुमची-माझी सगळ्यांची सिद्धता असली पाहिजे.

आमच्याशी कवडीचाही संबंध नाही
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरही शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. ‘ज्याचा आमच्याशी कवडीचाही संबंध नाही, त्यावर बोलण्याची गरज नाही. हे आरोप सत्यावर आधारित नाहीत,’ असे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

जातीचे राजकारण अशोभनीय
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असे वक्तव्य केले होते. त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘एका जातीचे राजकारण आम्हाला शोभत नाही. अंतर वाढेल असे भाष्य करणे योग्य नाही. सामाजिक ऐक्य हवे. आम्हाला व्यापक दृष्टिकोन पाहिजे’’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया
याशिवाय, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौ-याचे स्वागत केले आहे. दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता, भारत-पाकिस्तान सामन्यासारख्या ‘एक दिवसाच्या प्रश्नावर’ अधिक चर्चा करण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news