24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद निवडणूक

सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद निवडणूक

चाकूर : प्रतिनिधी
सर्व सामान्य नागरिक, शेतकरी यांच्या हक्कांसाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवित असून सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी राजकारण करीत असून शिक्षण, रोजगार, रस्ते ,वीज आणि पाणी या मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य असेल. वडवळ गट विकसित करणार आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी मंत्री बस्वराज पाटील मुरूमकर, पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या खंबीर नेतृत्वाचा आशीर्वाद पाठीशी असल्याने या वडवळ गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, भारतीय जनता पक्षाचे वडवळ नागनाथ जि.प. गटातील अधिकृत उमेदवार तथा ओम साई फार्मर प्रो.कंपनीचे अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी अशोकराव धोंडीराम चिंते यांनी केले.
तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला असून सर्वच उमेदवाराचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.त्यातच भाजपाने या अंतिम टप्प्यात आता नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराचा वेग वाढवला असून आता या मतदारसंघात फक्त भाजपा उमेदवार चिंते सध्या आघाडीवर असल्याचे चित्र दिसत येत आहे. प्रगतीशील शेतकरी चिंते हे घारोळा गावचे असून शेतक-यांच्या हितासाठी ओम साई फार्मर प्रो.कंपनीच्या माध्यमातुन त्यांचा परिसरातील शेतकरी यांच्याशी दांडगा जनसंपर्क आणि सर्व समाजाशी असलेली त्यांची नाळ जुळली असल्याने मतदारसंघातील मतदारराजा त्यांना साथ देणार असल्याची चर्चा होत आहे .
या जिल्हा परिषद गटातील वडवळ, आष्टा, मोहदळ, नांदगाव, अंबुलगा, लातूर-रोड, मोहनाळ, घरणीसह सर्व गावातील जनता आपला माणूस म्हणून चिंते यांच्या प्रचारात उतरली आहे. हे वातावरण पाहून विरोधकांनी आता धास्ती घेतली आहे. मतदार संघातील वातावरण पाहता त्यांच्या सोबतच्या दोन्ही पंचायत समिती गणातील-वडवळ ना.गणातील महिला उमेदवार गंगुबाई सुभाष कसबे आणि आष्टा गणातील विजयमाला श्रीमंत शेळके यांनाही मतदार पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR