Homeलातूरसार्वजनिक आरोग्य विभाग परिमंडळाच्या वतीने अपस्मार बाधित रुग्णांचे शिबिर 

सार्वजनिक आरोग्य विभाग परिमंडळाच्या वतीने अपस्मार बाधित रुग्णांचे शिबिर 

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय  आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग परिमंडळ, लातूर यांच्यावतीने विभागीय अपस्मार या आजाराचे निदान व उपचार शिबिर कस्तुराई मंगलकार्यालय, वाडा हॉटेल जवळ, छत्रपती चौक, लातूर येथे घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन लातूर परिमंडळच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या हस्ते झाले. सदरील शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर्स, न्यूरो फिजिशियन, सायकॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशन थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, जेनेटिक स्पेशलिस्ट यांनी लातूर, धाराशिव, नांदेड, बीड या जिल्ह्यातील १७० रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच रुग्णास औषधी उपलब्ध करून देण्यात आली. रुग्णांचे फॉलोअप मार्गदर्शन व अपस्मार आजाराबाबत जनजागृती करणे एवढ्या सुविधा पूर्णपणे मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  सदरील शिबिरास बाल मेंदू विकार तज्ञ डॉ. प्रशांत उटगे, डॉ. देवाशिष रुईकर, डॉ. अंकुश मैंदड यांच्या मार्फत रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली.  रूग्णांच्यावर मोफत तपासणी व उपचार, रक्त तपासणी करून रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच रुग्णांना तीन महिन्यांची मोफत औषधी उपलब्ध करून दिलेली आहे. सदरील शिबिरास लातूर जिल्ह्यातील १०६, धाराशिव जिल्ह्यातील २१, बीड जिल्ह्यातील ३०, नांदेड जिल्ह्यातील १६ अश्या एकूण १७३ लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
सदरील शिबीरासाठी लातूर जिल्हा परिमंडळ विभागीय उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, सहाय्यक संचालक डॉ. संजय ढगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारडा यांचे मागर्दशन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ आनंद कलमे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल कुंभारे, झेंडे अमोल, राजेंद्र सोनकांबळे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR