सावत्र बापाकडून १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील एका गावात पुन्हा भयंकर प्रकार घडला आहे. बाहेर कामासाठी आलेल्या कुटुंबातील ३० वर्षीय सावत्र बापाने दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यात पुन्हा संतापजनक प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भोरच्या राजगड पोलिसांत आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील एका गावात संबंधित कुटुंब बाहेरील जिल्ह्यातून कामासाठी आले होते. आरोपीने मुलीवर अत्याचार केला आहे. नराधमाच्या अत्याचारानंतर मुलीला शारीरिक त्रास होऊ लागला. त्यानंतर तिने हा प्रकार आईला सांगितला. आईने स्थानिक नागरिक आणि मुकादमाच्या मदतीने राजगड पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथक पाठवून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news