लातूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आशियाना निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जयंती समितीच्या पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष पिराजी साठे, काँग्रेस लातूर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी जवळेकर, माजी उपमहापौर कैलास कांबळे, नगरसेवक विकास कांबळे, अशोक देडे, आनंद वैरागे, जी. ए. गायकवाड, नारायण कांबळे, श्रीमंत गायकवाड, रवी कदम, विशाल काळे, श्रावण मस्के, काकासाहेब मगर आदी उपस्थित होते.
















