लातूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ वी जयंती लातूर शहरात साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात मुख्य ध्वजारोहण माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख व मान्यवरांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून या वेळी महापौर जयश्रीताई सोनकांबळे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर, प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर, जी. ए. गायकवाड, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष पिराजी साठे, सुरेश चव्हाण, नगरसेवक विकास कांबळे, सुनील बसपुरे, राज क्षिरसागर, महादेव म्हस्के, जिल्हापरिषद सदस्या आशाताई भिसे, गोरोबा लोखंडे, काका कांबळे आबासाहेब पाटील, संतोष देशमुख, महापालिका आयुक्त राहूल कुलकर्णी, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, पृथ्वीराज सिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुनील बसपूरे, आनंद वैरागे, अशोक देडे, अॅड. अंगद गायकवाड, संतोष देशमुख, अंगद वाघमारे, प्रा. प्रविण कांबळे, अविनाश बट्टेवार, अॅड. देविदास बोरुळे, सतीश हलवाई, केशरबाई महापूरे, सचिन दाताळ, भालचंद्र येडवे, रामभाऊ जवळगे, संभाजी रेड्डी, चाँदपाशा ईनामदार, शफी शेख, प्रमोद जाधव, शेख अब्दुल्ला यांची उपस्थिती होती. उपस्थित पाहूण्यांचे स्वागत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष पिराजी कांबळे, रवि कदम, विशाल काळे, बालाजी अरगडे, अश्विन कांबळे, आशितोष पाटूळे, काका कांबळे, अशोक देडे, आदर्श उपाद्धे, पप्पू मगर, अमर शिंदे, मंगेश वैरागे, आकाश मगर, अशोक मगर, अमर शिंदे, राजू पवार, आश्रुबा लोंढे, बापू मगर, नुतन हनमंते, काशिनाथ वाघमारे, छोटू मस्के, संघटक आकाश लोंढे, बाबा कांबळे, रघूनाथ कुचेकर, राजेंद्र लोदगेकर, रवी पठाडे, विक्की मगर, सहसंघटक पवन शिंदे, करण कांबळे, महादू कांबळे, नागनाथ कांबळे, दत्ता भूरे यांनी केले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होती. महिला, पुरूषांसह विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने अण्णा भाऊंना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. रात्री शहरातील विविध भागांतून वाजत-गाजत अण्णा भाऊंच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या सर्व मिरवणुकांचा समारोप साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकातील अण्णा भाऊंच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात झाला.
















