30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeराष्ट्रीयसिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ!

सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जर तुम्हीही सिगारेट किंवा पान मसाला असे तंबाखूजन्य पदार्थ खात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आजपासून तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावर सरकारने कर वाढवला आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.

वित्त मंत्रालयाने केंद्रीय उत्पादन शुल्क कायद्यात बदल केले आहेत. हा बदल आजपासून म्हणजे १ फेब्रुवारीपासून लागू झाला आहे. या नवीन नियमांनुसार सिगारेटवरील उत्पादन शुल्क अनेक वेळा वाढवण्यात आले आहे.
प्रति १००० सिगारेट उत्पादन शुल्क दर आता २,०५० ते ८,५०० पर्यंत जाणार आहे. काही सिगारेटवर कर ११,००० रुपयांपर्यंत पोहचू शकतो. हा दर सिगारेटची लांबी आणि श्रेणींवर अवलंबून आहे. याचसोबत सिगारेटवर आदीच लादलेला ४० टक्के जीएसटी तसाच राहिल. त्यामुळे एकूण दर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.

नवीन कर प्रणालीचा दर थेट सिगारेटच्या किरकोळ किंमतीवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, १८ रुपयांच्या किंमतीच्या सिगारेटचे दर ७० ते ७२ रुपयांपर्यंत पोहचू शकता. त्यामुळे धूम्रपान करणा-यांना चांगलाच फटका बसणार आहे.

तंबाखूजन्य पदार्थ महागणार
नवीन उत्पादन शुल्काचा परिणाम फक्त सिगारेटवर नाही तर तंबाखूजन्य पदार्थांवरही होणार आहे. कच्च्या तंबाखूवर ६० ते ७० टक्के कर आकारला जाईल. निकोटीन संबंधित उत्पादनांवर १०० टक्के कर लागू होतो. तसेच पान मसाला, गुटखा या पदार्थांवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लादला जातो. यामुळे सर्वच तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR