सिलिंडरसाठी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
घरगुती वापराच्या अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगसाठी केंद्र सरकारने नवा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात नियम तयार केला असून, आता अनुदानित घरगुती वापराच्या सिलिंडरच्या बुकिंगसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करावेच लागणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून सबसिडीसह नियंत्रित किरकोळ विक्री किमतीत सिलिंडर बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.

मंत्रालयाने बीबीए अर्थात बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन हे सबसिडी असलेला एलपीजी सिलिंडर ख-या आणि गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचेल, याची खात्री करण्यासाठी केले जात आहे. प्रत्येक एलपीजी जोडणी आधार प्रमाणित ग्राहकांशी जोडल्याने सबसिडी असलेल्या घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी होणारा गैरवापर टाळला जाणार आहे. याशिवाय दुबार आणि अपात्र एलपीजी कनेक्शन बंद केले जाणार आहेत. सबसिडीचे वितरण पारदर्शक आणि अचुकपणे होण्यास मदत होणार आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार आता १ ऑक्टोबरपासून ज्या ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण झालेले आहे, अशा ग्राहकांचे सबसिडीसह सिलिंडर बुकिंग होणार असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत आधार प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करावी लागणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून आता ग्राहकांना आधारची पडताळणी करणे अनिवार्य असणार आहे. सबसिडीचा लाभ हा योग्य व्यक्ती घेत आहे का, याची पडताळणी सरकार करत आहे. एलपीजी ग्राहकांनी आधारद्वारे पडताळणी केली नसलेल्यांना सरकारने वेळ वाढवून दिला होता. या आधी ३० जूनपर्यंत वेळ दिला होता. परंतु केंद्र सरकारने पुढे मुदतवाढ दिली. परंतु आता एलपीजी सबसिडीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य असणार आहे. तसेच ज्या ग्राहकांनी आधीच ई-केवायसी केली असेल, त्यांना पुन्हा नव्याने प्रक्रिया करण्याची गरज नाही.

डिलिव्हरी बॉय घरी गॅस सिलिंडर घेऊन येईल, त्यावेळी पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करता येईल. तसेच गॅस एजन्सीला भेट देऊन करता येईल. गॅस एजन्सीमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करता येईल. त्याचबरोबर मोबाईल अ‍ॅप्सद्वारे करता येईल. अधिकृत मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करून डिजिटल पद्धतीने आधार प्रमाणीकरण करता येईल. इंडियन ऑइल वन, हॅलो बीपीसीएल, एचपी पे असे तीन अ‍ॅपचा वापर करून आधार प्रमाणीकरण करता येईल.

१ ऑक्टोबरपासून
नियम केला कडक
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने दिला जातो. सप्टेंबर २०२६ मध्ये १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडवरील अंदाजित अनुदान २१० रुपये इतके आहे. जून महिन्यात वाढून ७२१ रुपये झाले होते. एलपीजी सिलिंडरच्या आधार प्रमाणीकरणासाठी अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु आता १ ऑक्टोबरपासून हाच नियम अधिक कडक केला जाणार आहे.

टोल फ्री क्रमांकावर
संपर्क साधता येईल
या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ग्राहक हे १८०० २३३३ ५५५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या क्रमाकांवर कॉल करून ग्राहक समस्या सोडवू शकतो. तसेच व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी घरगुती सिलिंडरचा होणारा गैरवापर रोखणे, बोगस कनेक्शन रद्द करणे आणि ख-या गरजू ग्राहकांपर्यंतच अनुदानाचा लाभ पोहोचवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळ अन् कर्जाचा ताण; निलंग्यात ४१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
01:41
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये दुर्गामातेच्या आगमनाची धूम! आदिवासी नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष
02:56
Video thumbnail
Latur|उदगीरच्या सोमनाथपूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
01:34
Video thumbnail
Nanded|माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात बेशिस्त ऑटोचालकांवर वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा!
01:18
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43

Latest news