23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeमहाराष्ट्रसुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करम्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. बडगुजर यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली होती. त्याशिवाय बडगुजर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरू होती.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एकहाती आलेली सत्ता, यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा नाशिकमध्ये अधूनमधून होत होत्या. आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचे जाहीरपणे म्हटले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत असल्याची चर्चा पुन्हा नाशिकमध्ये सुरू झाली. आज ठाकरे गटाकडून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कोण आहेत सुधाकर बडगुजर
बडगुजर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते म्हणून कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीवेळी एकट्याने खिंड लढवत पक्षाचा खासदार निवडून आणला. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हीडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. महापालिकेत नगरसेवक असताना स्वत:च्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी एसीबीकडून चौकशी झाली. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR