27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीचे ठरले लग्न

सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीचे ठरले लग्न

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न ठरले आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचा विवाह निश्चित झाला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने ही गुड न्यूज जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत लग्न ठरल्याची बातमी शेअर केली.

रेवती आणि सारंग या दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत स्मृती यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारंग अरुण लखानी हे नागपूरचे आहेत, त्यामुळे रेवती सुळे या नागपूरच्या सूनबाई होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुळे व पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारंग अरुण लखानी हे नागपूरचे असून, व्यवसायी आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते सुपुत्र आहेत. तेही एक उत्तम बॅडमिंटनपटू असल्याचे समजते. उद्योजक सारंग लखानी आणि रेवती सुळे यांच्या या नव्या प्रवासासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने लग्न ठरल्याची माहिती देखील समोर आली आहे.

रेवती सुळे या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची मुलगी आहेत. शरद पवार यांची त्या नात आहेत. त्यांना विजय सुळे हा एक भाऊही आहे. रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. स्मृती शिंदे यांनी रेवती व सारंग यांचे लग्न ठरल्याची पोस्ट करताच बघता बघता ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर रेवती यांचा भाऊ, विजय सुळे यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरी शेअर करत बहिणीचे व भावी जिजाजींचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR