23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्र‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग

‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

संशयास्पद बॅगेची सध्या तज्ज्ञ पथकांकडून कसून तपासणी केली जात असून, यात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात ‘प्लीज टेक फ्री शूज अँड क्लोथ्स’ असे लिहिल्याचे आढळून आले. या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस सर्व तांत्रिक बाबींची कसून चौकशी करत आहेत. आमदार नितेश राणे यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आणि त्यांना लाभलेली कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहता, त्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे संशयास्पद वस्तू मिळणे ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR