सुषमा अंधारे, आगवणेंवर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

फलटण : सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. याबद्दल त्यांनी ४८ तासांच्या आत माध्यमांसमोर लेखी माफी मागावी, अन्यथा ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाईल अशा आशयाची नोटीस अंधारे आणि आगवणे यांना पाठविली आहे, अशी माहिती अ‍ॅड. धीरज घाडगे यांनी दिली.

फलटण येथे सोमवारी पत्रकार परिषदेत अ‍ॅड. धीरज घाडगे यांच्यासह अ‍ॅड. सचिन शिंदे, अ‍ॅड. नरसिंह निकम उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. घाडगे म्हणाले, ‘सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी २७७ एफआयआर दाखल केल्याचा आरोप चुकीचा आहे. उपविभागीय पोलिस अधिका-यांनी दिलेल्या पत्रात फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलिसांत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून ऊस मुकादमाविरोधात तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. मुकादमांना उचलून आणणे, मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देणे, अटकेनंतर अनफिट असतानाही फिटनेस सर्टिफिकेटसाठी स्थानिक डॉक्टरवर दबाव आणणे, त्यात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा समावेश असणे असा एकही प्रसंग घडला नाही.

आरोपीने पोलिसांकडून मारहाण झाल्याची कोणतीही तक्रार न्यायालयाकडे केली नाही. सुषमा अंधारे ज्यांच्या सोबत बसलेल्या आहेत, त्या जयश्री दिगंबर आगवणे मोक्कामधल्या आरोपी असून त्यांनी फलटण पोलिस ठाण्यात कर्मचा-यांना मारहाण केली आहे. सुषमा अंधारे स्वत:चा पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी आल्या होत्या, की मृत डॉक्टरप्रती सहानुभूतीसाठी गेल्या होत्या, की पुण्यातच बसून नाईक-निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी आल्या, असा सवालही अ‍ॅड. घाडगे यांनी केला.

या आरोपांचेही वकिलांकडून खंडन
रणजितसिंह यांच्या त्रासामुळे नंदकुमार ननावरे यांनी आत्महत्या केल्याचे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे. परंतु, त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती असल्याचे त्यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. तसेच त्यांनी कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नसल्याने कोणत्या बँका बुडवल्या हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही अ‍ॅड . घाडगे यांनी यावेळी दिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news