- Advertisement -
लातूर : प्रतिनिधी
तिफण फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित पूरस्कार वितरण सोहळ्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते ‘कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याने’ लातूर येथील उप कृषी अधिकारी सूर्यकांत लोखंडे यांना ‘तिफण कृषी गौरव’ पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, अॅग्रोवन चे कार्यकारी संपादक रमेश जाधव, संचालक रफिक नायकवाडी, पूणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, तिफण फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव जमधडे, अनंत देशमुख, प्रदीप भोर, संतोष पाटील, भूजंग लोकरे उपस्थित होते.
- Advertisement -
















