20 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमुख्य बातम्यासेबी अध्यक्ष बूच यांना लोकलेखा समितीचे समन्स

सेबी अध्यक्ष बूच यांना लोकलेखा समितीचे समन्स

मुंबई : वृत्तसंस्था
सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच या हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर वादात सापडल्या असून, त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. संसदेची सर्वोच्च समिती असलेल्या लोक लेखा समितीने माधबी पुरी बूच यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले. इतकंच नाही, तर महसूल विभागातील अधिका-यांनाही चौकशीसंदर्भात समन्स पाठवण्यात आले आहे. माधबी पुरी बूच आणि इतर अधिका-यांना २४ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पीएसी अर्थात लोक लेखा समिती संसदेची वरिष्ठ समिती आहे. या समितीमध्ये २२ सदस्य असतात. महत्त्वाचे म्हणजे या समितीच्या सदस्यांना सरकारमध्ये मंत्री होता येत नाही. केंद्र सरकारचा महसूल आणि खर्च यांचे ऑडिट करण्याचे काम ही समिती करते. लोक लेखा समितीने आयटी कंपनी इन्फोसिसलाही समन्स बजावले आहे. लोक लेखा समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल आहेत. या समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR