लातूर : प्रतिनिधी
नीट पेपरफुटीप्रकरणीकेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षांचे योग्य नियोजन करावे या मागणीसाठी दिल्ली येथे वैज्ञानिक, शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक आणि विद्यार्थी यांच्या उपोषणाला लातूर जिजाऊ ब्रिगेड पूर्व यांच्या वतीने पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.
लातूर जिजाऊ ब्रिगेड पूर्वच्या वतीने लातूर उपजिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर यांच्याकडे केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांप्रती सरकारच्या उदासीनतेबाबत जिजाऊ ब्रिगेड निषेध व्यक्त केला. निवेदन देण्यासाठी लातूर जिजाऊ ब्रिगेड पूर्व जिल्हाध्यक्ष अर्चनाताई पाटील, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सदस्य लताताई बावणे, विभागीय अध्यक्ष रंजनाताई चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष मिरा देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अनिता मुदगले, जिल्हा कार्याध्यक्ष योगिता ठाकूर, संघटक जयश्री हांडे सहारा शेख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
















