जळगाव : प्रतिनिधी
सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. जळगाव, येथील सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या भावात २७ जानेवारी, मंगळवारी पाच हजारांची घट झाली होती. त्यात २८ जानेवारी, बुधवारी पुन्हा २३ हजारांची, तर सोन्याच्या भावात चार हजार ७०० रुपयांची वाढ झाली. जणू भाववाढीचा उच्चांक झाला. यामुळे सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण आहे. शिवाय खरेदीदारांनी देखील सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
सोने-चांदी आता सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र, श्रीमंत गुंतवणूक करीत आहेत. आज २९ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ११,७७० रुपयांनी वाढले आहेत, तर २२ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १०,८८० रुपयांनी वाढले आहेत.
बुधवारी सोन्यात चार हजार ७०० रुपयांची वाढ झाली. सोने ‘जीएसटी’सह एक लाख ८२ हजारांवर (प्रतिदहा ग्रॅम) पोहोचले. बुधवारी चांदीत २३ हजारांची वाढ होऊन ‘जीएसटी’सह ४ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे.

