जळगाव : प्रतिनिधी
मागील दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोने- चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ बघायला मिळाली. भारतीय सराफा बाजारात आज २९ नोव्हेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव १२६९२० रुपयांवर व्यवहार करत आहे. २८ नोव्हेंबरच्या तुलनेत या किमतीत १.१३ टक्के म्हणजेच १४१६ रुपयांची भरभक्कम वाढ झाली आहे.
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात. आज सोने सव्वा लाखाच्या पार गेल्याने भर थंडीतही खरेदीदार ग्राहकांना घाम फुटत आहे. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोने १२६९२० रुपयांवर व्यवहार करत आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत तर तब्बल ९०५५ रुपयांची वाढ झाली आहे. मार्केटमध्ये सध्या एक किलो चांदी १७१५२२ रुपयांवर आहे. चांदीची ही सध्याची किंमत आत्तापर्यंतची सर्वांत जास्त आहे

