सोलरद्वारे गरिबांना मोफत वीज

अनुसूचित जाती जमातीतील घरांना वीज देण्याचा मानस : मुख्यमंत्री
नागपूर : प्रतिनिधी
‘प्रत्येक गरजू अनुसूचित जाती-जमातीच्या घराला सोलरची सुविधा उपलब्ध करून देत त्यांना मोफत विजेचा लाभ मिळवून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. अनुसूचित जाती-जमातीसह हळूहळू ओबीसी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना याद्वारे मोफत वीजपुरवठा होणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूरतर्फे जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ई-रिक्षा वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मंचावर महसूलमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार मोहन मते, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार संजय मेश्राम आदी उपस्थित होते.

या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील एकूण ५५५ गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना ई-रिक्शा, मोटराइज्ड ट्रायसिकल, ई-किराणा रिक्षा, ई-भाजीपाला रिक्षा, फूड कार्टचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात ‘घर-घर संविधान’ या उपक्रमांतर्गत संविधान प्रास्ताविकेचे वाटप आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिनीचे ७/१२ उतारे वाटप कॉफी टेबल बुक, चॅटबोट आणि ऍडव्हेंचर पार्कचे उद्घाटन झाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news