सोलापुरात राजकीय भूकंप?

जिल्ह्यातील ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फडणवीसांसोबत खलबते
अजित पवार गट, कॉंग्रेसला धक्का?
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे, राजन पाटील, यशवंत माने आणि दिलीप माने यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी ऐन दिवाळीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या राजकीय नेत्यांसोबत कार्यकर्तेही मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीत प्रवेशाचा धमाका होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचाराधीन असले तरी त्यांचे पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. राजन पाटील आणि यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून तर दिलीप माने हे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

या राजकीय हालचालीनंतर महाविकास आघाडीवर विश्वास राहिला नसल्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश होत आहेत, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर गुरुवारी रात्री उशिरा एक गुप्त बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने ही मेगा भरती सुरू केली आहे. महाविकास आघाडी केवळ राजकीय मुद्यांवर चर्चा करत असून विकासापासून दूर गेली आहे तर महायुती सरकार विकासाच्या अजेंड्यावर काम करत असल्याने अनेक नेते भाजपमध्ये येत असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन काही नेते पक्षात सामील होत आहेत. मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांची मोठी ताकद असून, त्यांच्या प्रवेशाने भाजपला या भागात बळकटी मिळेल. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वत: नियोजन करत आहेत आणि या अनुषंगाने संबंधितांचे पक्षप्रवेश लवकरच होतील, असे सूत्रांनी सांगितले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news