25 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeसोलापूरसोलापुरात वृध्द, दिव्यांगांसह ३१५४ जणांचे टपाली मतदान

सोलापुरात वृध्द, दिव्यांगांसह ३१५४ जणांचे टपाली मतदान

सोलापूर-
सोलापूर लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील वृध्द, दिव्यांगांचे गृहभेटीतील मतदान व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली असे एकूण ३ हजार १५४ जणांचे तर माढा लोकसभा मतदारसंघात ६ हजार १५८ जणांचे मतदान झाल्याची माहिती टपाली मतपत्रिकांचे प्रमुख तथा महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गृहभेटीद्वारे झालेले व निवडणूक कामात असलेले अधिकारी आणिकर्मचारी यांनी केलेल्या टपाली मतदानाची एकत्रित माहिती प्रशासनाने दिली आहे.
सोलापुरात ८५ वर्षांपुढील १ हजार २२२ जणांचे मतदान, १२४ दिव्यांगांचे मतदान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांनी केलेले एकूण टपाली मतदान ४६९, इतर १० लोकसभा मतदारसंघाकडून प्राप्त झालेल्या एकूण टपाली मतपत्रिका ९१४, भारतीय सैन्य दलातील अधिकारी / सैनिक यांच्याकडून टपालाने आजपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण टपाली मतपत्रिका ४२५ अशा एकूण ३ हजार १५४ जणांनी मतदान केले.

माढा लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांपुढील १ हजार ५५६ जणांचे मतदान, २०६ दिव्यांगांचे मतदान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांनी केलेले एकूण टपाली मतदान ३१६, इतर १० लोकसभा मतदारसंघाकडून प्राप्त झालेल्या एकूण टपाली मतपत्रिका ३१३७, भारतीय सैन्य दलातील अधिकारी / सैनिक यांच्याकडून टपालाने आजपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण टपाली मतपत्रिका ९४३ अशा एकूण ६ हजार १५८ जणांनी मतदान केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR