भंडारा : प्रतिनिधी
भंडारामधून मोठी बातमी समोर आली आहे. २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडा-यात विद्यार्थ्यांना घेऊन पवनीवरून भिवापूर येथे खाजगी स्कूल बस जात होती. या बसमध्ये एकूण २२ विद्यार्थी, १ केअर टेकर आणि ड्रायव्हर होता. ही स्कूल बस निलज फाटा येथे येताच बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. पुढे जाऊन ही बस झाडाला धडकली.
या दुर्घटनेत बसमधील २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे हलविण्यात आले

