अहमदपूर : प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लोकांमध्ये राहणारा व मतदारांच्या मनातील उमेदवार देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी टाकळगाव तालुका अहमदपूर येथे केले.
तालुक्यातील टाकळगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत वाहीनीच्या स्थलांतरित कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मंचावर बापुदेव महाराज बेलगावकर, बाळासाहेब पाटील टाकळगावकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, सुंदर साखरे, तुकाराम पाटील, दयानंद सुरवसे, शिवाजी पाटील, दिपकराव जाधव, बालाजी रोकडे, सतीश नवटक्के, नागोराव घोगरे, नानासाहेब घोगरे, साहेब शेख, बब्रुवान पठाण, जानखा पठाण, दिलीप पाटील, तानाजी घोगरे, हुसेन शेख, प्रकाशराव गोरडे, भारत शिंदे, वेंकटराव जांभळदरे, शेषराव चावरे, बाळासाहेब पवार, राम चव्हाण, नितीन पाटील, पांडू धडे, महावितरणचे माने, महाळकर, तानाजी घोगरे, नागोराव घोगरे, विशाल करंडे, प्रसन्न कानवटेहे उपस्थित होते.
मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, या भागात विद्युत पोलची गरज लक्षात घेऊन ११ लाख रुपयांचे ३५ पोल या ठिकाणी देण्यात आले असून यामुळे टाकळगावकरांची समस्या दूर होणार आहे. विधानसभा मतदारसंघातून हरित क्रांती करायची असून दूध डेरीच्या माध्यमातून दुग्ध क्रांती सुरु आहे. यावर्षी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन शेतक-यांच्या पाठीशी आहे. शासन सर्वोतपरी मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी काळात या भागात पुलांची कामे घेऊन दळणवळण करण्याचा माझा प्रयत्न असेल. आम्हाला राजकारण विकास करण्यासाठी करायचे असल्याचे सहकारमंत्री पाटील यावेळी म्हणाले.

