‘स्पेसएक्स’चे भरकटलेले रॉकेट चंद्रावर आदळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एलॉन मस्­क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीचे एक भरकटलेले रॉकेट वेगाने चंद्राच्या दिशेने झेपावत आहे. ते लवकरच चंद्रावर आदळणार आहे. हा ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन ९’ रॉकेटचा वरचा भाग असून, जानेवारी २०२५ मध्ये दोन ‘लूनर लँडर्स’सह त्याचे उड्डाण करण्यात आले होते. बुधवार, ५ ऑगस्­ट २०२६ रोजी हे रॉकेट प्रचंड वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर धडकणार आहे. या भीषण टकरीमुळे चंद्रावर धुळीचे महाकाय लोट उठणार असून, या दुर्मिळ घटनेचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ उत्सुक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत अंतराळ अभ्यासक बिल ग्रे यांनी सांगितले की, ही धडक तब्बल ८,७०० कि.मी. प्रतितास या अद्भूत वेगाने होईल. हा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा सात पटीने अधिक आहे. चंद्राच्या सूर्यप्रकाश असलेल्या पश्चिमेकडील भागातील ‘आईन्स्टाईन क्रेटर’जवळ ही धडक होईल. अमेरिकेच्या वेळेनुसार ही घटना भल्या पहाटे घडणार आहे. त्यामुळे अमेरिका आणि कॅनडाच्या पूर्व भागातून, तसेच दक्षिण अमेरिकेतील बहुतांश भागांतून हा थरार पाहता येणार आहे. आंतरराष्ट्रीय टीमच्या अभ्यासानुसार, या टकरीमुळे निर्माण होणारा धुळीचा लोट इतका चमकदार असेल की, चंद्राच्या काठाजवळ अंधा-या आकाशात तो स्पष्टपणे दिसून येईल. अत्याधुनिक दुर्बीण असणारे हौशी खगोलप्रेमीही हा नजारा पृथ्­वीवरून पाहू शकतील.

१०० किलोमीटर उंच उठणार लोट!
ही धडक चंद्राच्या समोरील बाजूला होणार असून, त्यातून ३ टन टीएनटी स्फोटाएवढी प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. तज्ज्ञांच्या मते, टकरीचा लखलखाट अवघ्या एका सेकंदापेक्षा कमी वेळेचा असेल; मात्र, त्यातून उडालेला ढिगारा अनेक किलोमीटरपर्यंत पसरून दुर्बिणीद्वारे काही मिनिटांपर्यंत पाहायला मिळू शकेल. या धडकेमुळे उडालेल्या मलब्याचा लोट ७५ ते १०० किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘टॅक्सस युनिव्हर्सिटी’चे संशोधक सहयोगी विल्यम जो यांनी ‘स्पेस डॉट कॉम’शी बोलताना सांगितले की, धडकेनंतरच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत हा धुळीचा लोट अंधा-या आकाशाच्या पार्श्वभूमीवर कित्येक पटीने अधिक चमकदार दिसेल.

चंद्रावरील दुसरीच दुर्घटना
‘स्पेस-एक्स’चा हे रॉकेट चंद्रावर धडकावण्याचा कोणताही उद्देश नव्हता. अंतराळतज्ज्ञांच्या मते, रॉकेटचा वरचा भाग सूर्याच्या कक्षेत ढकलला गेला असता, तर ही टक्कर टळली असती. मात्र आता अनवधानाने किंवा चुकीमुळे रॉकेट चंद्रावर आदळण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी २०२२ मध्ये चीनच्या एका रॉकेटच्या भागाची चंद्राच्या दुस-या बाजूला धडक झाली होती, ज्यामुळे तिथे दोन मोठे खड्डे पडले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news