15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeलातूरस्मार्ट व्हिलेज सिकंदरपूर येथे एक दिवस गावाक-यांसोबत ग्राम दरबार

स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूर येथे एक दिवस गावाक-यांसोबत ग्राम दरबार

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामसंसद सिकंदरपुर येथे एक दिवस गावक-यांसोबत ग्राम दरबार व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याविषयी बैठक घेण्यात आली.
ग्राम दरबार या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या उपक्रमशील सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे तर प्रमुख प्रमुख मार्गदर्शक म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अधिकारी श्याम गोडभरले, तालुका अंतर्गत सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व ‘एक दिवस गावाक-यासोबत’ ग्राम दरबार या नावीन्य पूर्ण उपक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ व गट विकास अधिकारी श्याम गोडभरले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या अभियानांतर्गत पशु रोग निदान शिबिर, स्वनिधीमधून अपंगाणा धनादेशाचे वाटप, महिला बचत गट यांना कर्ज वाटप, ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी डस्टबिनचे वाटप, प्लास्टिक बंदीची अंमल बजावणी करण्यासाठी कापडी पिशवीचे वाटप, जि. प. शाळेतील विध्यार्थीना एक विध्यार्थी एक झाड वाटप, मोदी आवास योजनेतून घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्यांचा ग्रहप्रवेश, तसेच वैकुंठ धाम येथे घन कचरा व्यवस्थापन नाडेफ खत प्रकल्पचा शुभारंभ, श्रमदानातून बांधण्यात आलेल्या वनराई बंधा-याचे जलपूजन सह गावात बसवण्यात येत असलेल्या सी. सी. टीव्ही कॅमेरा बसवण्याचा शुभारंभ, तीन मेगाव्याट किलो सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा शुभारंभ आशा विविध प्रकारच्या नावीन्य पूर्ण उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.
या अभियानाचा शुभारंभ संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या अभियानाचे प्रास्ताविक यशदा प्रविण प्रशिक्षक माधव गंभीरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प. स. चे विस्तार अधिकारी सोमाणी यांनी केले. या नावीन्यपूर्ण कार्यक्रमास उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व समितीच्या पदाधिका-यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR