लातूर : प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी लातूर दौ-यात सोमवारी आशियाना निवासस्थानी भेट देऊन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सोबत शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली पीक विमा,अनुदान, दुष्काळ साखर कारखाने यावर चर्चा केली तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरात शेतक-यांना शून्य टक्के दराने पाच लाख रुपये बिनव्याजी योजना व शुभ मंगल साठी शून्य दराने शेतक-यांना कर्ज देण्याच्या योजनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांचे कौतुक केले.
या चर्चे प्रसंगी राजू शेट्टी यांनी मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने योग्य भाव देवून वेळेवर शेतक-यांना बिलाची रक्कम देतात त्याबद्दल कौतुक केले. यावेळी राजू शेट्टी यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, माजी चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, ट्वेन्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धर्मराज पाटील, माणिकराव गायकवाड, महारुद्र चौंडे, रविंद्र इंगळे, विधी आघाडीचे अध्यक्ष अँड. विजय जाधव यांच्यासह मांजरा परिवारातील साखर कारखान्यातील संचालक मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
















