25.3 C
Latur
Saturday, November 8, 2025
Homeलातूरहजरत सुरत शाहवली (र.) यांचा उरूस; आज मुशायरा 

हजरत सुरत शाहवली (र.) यांचा उरूस; आज मुशायरा 

लातूर : प्रतिनिधी
येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सुरत शाहवली (र.) यांचा ३८७ वा उर्स दि. २३ ते २९ ऑक्टोबर या दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. आज दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता दर्गा शरिफमध्ये मुशायरा (कवी संमेलन)आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सुरत शाहवली(र.) यांचा उर्स दरवर्षी सर्वधर्मिय भाविक एकत्र येऊन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करता. याही वर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात  आलेले आहेत. आज पोलीस अधीक्षक अमोल तांबे, दिशा प्रतिष्ठानचे अभिजीत देशमुख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, मनपाचे माजी सभापती रामभाऊ कोंबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुशायरा होणार आहे. या मुशा-याचे सुत्रसंचालन डॉ. गाजी असर (उमरखेड) हे करणार आहेत. मुशा-यात डॉ. मुनीब हनफी(परभणी), नसीम नवाज (अमरावती), गालिब आसी (नांदेड), करीम दरवेश (मध्यप्रदेश), अनसारी जावेद (मिर्जापुर,यु.पी.), खटपट भैस्वी(तेलंगाना), बजरंग पारीख(अकोला), अब्दुल लतीफ खालिद(पाथरी), जुबेर गोहर( राजस्थान) आणि सरफराज आलम(हैदराबाद) हे शायर सहभागी होणार आहेत.
याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उर्स कमिटीचे अध्यक्ष विष्णुदास धायगुडे, कार्याध्यक्ष संजजय म्हेत्रे, स्वागताध्यक्ष चाँदपाशा इनामदार, सचिव अ‍ॅड. फारुक शेख, संदल प्रमुख अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, सहसचिव खय्युम शेख, उपाध्यक्ष नेताजी बादाडे, उपाध्यक्ष अहेमदखा पठाण, सदस्य रामभाऊ कोंबडे, सदस्य गोरोबा लोखंडे, सदस्य अब्दुल्ला शेख, सदस्य खलील शेख, चाँदपाशा मुजावर, ख्वॉजा मुजावर, तौफिक मुजावर, समिऊल्ला मुजावर, मैनोद्दिन मुजावर, शफी मुजावर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR