26.3 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रहरणाचे मटण तर सुरेश धसांसाठीच: ओबीसी नेते टी. पी. मुंडे

हरणाचे मटण तर सुरेश धसांसाठीच: ओबीसी नेते टी. पी. मुंडे

बीड : बीडमध्ये प्रत्येक टापूत एक दादा, भाऊ, भाई, आका आणि आकांचा आका समोर येत आहे. शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेचे अनेक प्रताप समोर येत आहेत. त्याच्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. हरण तस्करीमध्ये सुरेश धस यांनाही सहआरोपी करा. ते पण आकांचे आका आहेत. वाल्मिक कराड याच्यापेक्षा तर सुरेश धस यांच्यावर जास्त गुन्हे आहेत असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी भाजप नेते सुरेश धस यांच्यावर केला आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील सतीश ऊर्फ खोक्या भोसले याने मारलेल्या हरणांचे मटण सुरेश अण्णा धस यांना पोहोचते केले जाते. हरीण, डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते? स­तीश भोसलेवर गुन्हे दाखल होत नाहीत असा सवाल टी. पी. मुंडे यांनी केला आहे. हा खोक्या आणि त्याचे साथीदार चार-दोन किलोचा डबा भरून सुरेश धसांना घेऊन जायचे असा आरोप त्यांनी केला.

असा प्रकार जर होत असेल तर स­तीश भोसलेवर गुन्हा कसा दाखल होईल, असा सवाल मुंडे यांनी केला. या गंभीर प्रकरणासंदर्भात वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे. मात्र त्यांच्या बॉसला मुख्यमंत्री यांची मी विशेष भेट घेणार आहे. या मुद्यावर मी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी माहिती टी. पी. मुंडे यांनी दिली.

उद्या शिरूरमध्ये मोठा मोर्चा
याप्रकरणी धस आणि खोक्या यांच्याविरोधात ९ मार्च रोजी (रविवार) शिरूर येथे मोठा मोर्चा काढणार असल्याचे टी. पी. मुंडे म्हणाले. दरम्यान त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद पण साधला.

पोलिस आणि वनविभाग अ‍ॅक्शन मोडवर
शिरूर कासारचा भाजप पदाधिकारी सतीश ऊर्फ खोक्या भोसले सध्या गुन्हे करून फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खोक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. शिरूर कासार पोलिस स्टेशन आणि वन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईतून स­तीश ऊर्फ खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.

त्याच्या घरातून पथकाने मेलेल्या प्राण्याचे वाळलेले मांस जप्त केले आहे. साधारणपणे हे मांस एका महिन्यापूर्वीचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हे मांस कोणत्या प्राण्याचे आहे हे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच पोलिसांनी खोक्याच्या वस्तीवर आणि इतर घराची झाडाझडती घेऊन वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणा-या जाळ्या जप्त केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR