Homeमहाराष्ट्रहवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

हवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाशी संबंधित घटनेनंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास लँडिंग करताना एका लढाऊ विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्यामुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही.

या घटनेनंतर धावपट्टी मोकळी करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत आज शनिवारी (१८ एप्रिल) सकाळी ट्वीट करून सांगितले की, या घटनेची माहिती सर्व संबंधित विमान कंपन्यांना देण्यात आली होती आणि परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रशासन सतत संपर्कात होते.

माहितीनुसार, धावपट्टीवरील काम पूर्ण झाले असून विमानतळावरील उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सकाळी ०७:३० वाजल्यापासून प्रस्थान सेवा सुरू होणार असून आगमन सेवा सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल. दिवसभरात पुण्यातील हवाई वाहतूक हळूहळू पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR