अमरावती : प्रतिनिधी
एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि १९ मुले आहेत. तो म्हणतो की, मला तीस-पस्तीस मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका १९ मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन, चार-चार मुलं जन्माला घातली पाहिजेत असे अजब विधान नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
मौलाना सय्यद कादरी यांनी मला ४ बायका आहेत व १९ मुले आहेत असे सांगितले, यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली.
नुकतेच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या मुद्यावरून मोठे वक्तव्य केले होते. ‘काँग्रेसने आजवर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या आमदारांनीही तेच करण्याचा प्रयत्न केला’ असा आरोप नवनीत राणा यांनी केला.
‘मी सगळ्या हिंदू लोकांना सांगते की जर ते खुलेपणे सांगत असतील की ४ बायका आणि १९ मुलं आहेत तर आपण किमान तीन-तीन चार-चार मुलं जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवायचा आहे. ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत यामध्ये काही दुमत नाही’, असे नवनीत राणा म्हणाल्या.

