Homeलातूरहिप्पळगाव सोसायटीच्या इमारतीचे आज उद्घाटन

हिप्पळगाव सोसायटीच्या इमारतीचे आज उद्घाटन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
हिप्पळगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सुसज्ज नव्या इमारतीचे आज उद्घाटन होणार असून या सोहळ्यास माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.   माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ. शिवाजी काळगे हे उपस्थित राहणार असून या प्रसंगी जेष्ठ संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, जिल्हा उप निबंधक व्ही.एल. पोतंगले, जागृती शुगर उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँक उपाध्यक्ष प्रमोद जाधव, सहाय्यक निबंधक एन.एस. किलचे, माजी जि.प. सदस्य डी.एन. शेळके,जि.प. सदस्य माणिक गायकवाड, संचालक व्यंकटराव बिरादार, जयेश माने, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    या उद्घाटन समारंभासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नव्याने उभारण्यात आलेली ही इमारत सोसायटीच्या कामकाजास गती देणारी ठरणार असून सभासदांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे.  कार्यक्रमासाठी सोसायटीतर्फे जिल्हा बँकचे संचालक अनुप शेळके, चेअरमन बापूराव माने, व्हाईस चेअरमन सुरेखाताई साबदे, गटसचिव नवनाथ गिरी, संचालक दिलीप गड्डीमे, तुकाराम मोरमपल्ले, भागवत व्यंजने, विजयकुमार माने, रमेश सोनवणे,रमाकांत मुरुडकर, अलाऊद्दीन मुजावर, अंकुश बोळेगावे, अविनाश खांडेकर, सुनंदाताई कोकरे व सभासद यांच्याकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR