Homeलातूर‘हिरकणी हाट’ चे उद्घाटन

‘हिरकणी हाट’ चे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा स्तरीय बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिरकणी हाट’ या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील याच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडले.  या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राज्य कृषी मूल्य अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, प्रकल्प संचालक संजय इंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा परिषद विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.
  प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरवसे यांनी उमेदच्या या हिरकणी हाट उपक्रमाचे कौतुक करून महिलाना प्रोत्साहित करून विक्रीसाठी शुभेछा दिल्या. गावाखेड्यातून आलेल्या या गटाच्या ताईंनी प्रामाणिकपणे आपल्या जिद्दीने तयार केलेले विविध पदार्थ हे नक्कीच नाविन्यपूर्ण असून ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारे आहेत. या बचत गटाच्या यशाच्या उत्सवाला सर्व लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करून स्टॉल धारक महिलाना राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणा-या फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी, वैयक्तिक व्यवसाय कर्ज विनियोग कशा पद्धतीने महिलांनी करावा याविषयीची सविस्तर माहिती दिली. यावेळी महिलाना विविध कर्ज  वितरण धनादेश मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आले. प्रसंगी सर्व मान्यवरांनी बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन स्टॉलवरिल विविध नाविण्यपूर्ण उत्पादनांचे कौतुक करून महिलाना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खुदासे यांनी केले. पांडुरंग जेटनवरे यांनी आधार प्रदर्शन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR