हैदराबाद : वृत्तसंस्था
दिल्ली युनिव्हर्सिटीनंतर आता हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या निवडणुकीतही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत अभाविपने डाव्यांची विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयुआयला मागे टाकले.
अभाविप पॅनलमधून शिवा पालेपु अध्यक्ष, देवेंद्र उपाध्यक्ष, श्रुती महासचिव, सौरभ शुक्ला संयुक्त सचिव, ज्वाला प्रसाद क्रीडा सचिव आणि वीनस सांस्कृतिक सचिव म्हणून निवडून आले. इतकेच नव्हे तर इतर लहान पदांवरही अभाविपने विजय मिळवून बहुमत मिळवले. गेल्या सहा वर्षांपासून विद्यापीठात डावे, दलित संघटना आणि एनएसयूआयचा दबदबा होता. अभाविपचा विजय विद्यार्थ्यांच्या बदलत्या कलाचा आणि राष्ट्रवादी विचारसरणीकडे झुकण्याचा पुरावा मानला जात आहे. सामाजिक विज्ञान विभागासारख्या वामपंथी प्रभाव असलेल्या विभागांमध्येही अभाविपचा विजय हा विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत झालेल्या बदलाचे द्योतक आहे.
















