रांची : वृत्तसंस्था
रांची येथे झालेल्या दुस-या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. अक्षर पटेलपासून ते कुलदीप यादव आणि नमन धीरपर्यंत सर्व फिरकी गोलंदाजांची धुलाई झाली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४९ धावा केल्या. प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार अय्यर यांनी अनेक रणनीती आखल्या. परंतु रांचीच्या दवबिंदूंनी आणि शाई होपच्या झुंजार वृत्तीने त्यांच्या सर्व योजना निष्फळ ठरल्या.
मैदानाच्या आजूबाजूला चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. शाई होप आणि शेर्फेन रदरफोर्ड यांनी असे वादळ निर्माण केले की मयंक यादवचा वेग, अर्शदीपचा स्विंग आणि कुलदीप यादवची फिरकी, हे सर्व निष्प्रभ ठरले.
















