लातूर : प्रतिनिधी
महापौर जयश्रीताई सोनकांबळे, आयुक्त श्रीमती मानसी यांचे निर्देशानुसार दि. १५ जून रोजी गंजगोलाई भागात सिंगल युज प्लास्टीकवर कार्यवाही करण्यात आली. १० किलो प्लास्टिक जप्त करुन ९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सदर कार्यवाही दरम्यान ३ आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करून १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला असून ९ हजार ३०० रूपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच सार्वजनीक ठिकाणी कचरा टाकणा-या दोन नागरिकांना दंड करण्यात आला.
सदर कार्यवाही दरम्यान प्रमुख स्वच्छता निरिक्षक अक्रम शेख, स्वच्छता निरीक्षक महादेव फिस्के, प्रदीप गायकवाड, रवि शेंडगे, श्रीकांत शिंदे, निलेश शिंदे, कर्मचारी उपस्थित होते. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून शहरातील व्यवसायीकांनी व नागरिकांनी प्लास्टिक कॅरीबग वापर टाळून कापडी बॅगचा वापर करावा व पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा तसेच सार्वजनीक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन उपायुक्त वसुधा फड यांनी केले आहे.
















