नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा आज (शनिवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांनी, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ९१ पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसात तिस-यांदा ही दरवाढ झाली आहे. यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १९ मे रोजी पेट्रोल ८७ पैशांनी आणि डिझेल ९१ पैशांनी महाग झाले. गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल अंदाजे ५ रुपयांनी महाग झाले आहे.
आज दिल्लीत पेट्रोलचे दर ८७ पैशांनी वाढून ९८.६४ रुपये प्रति लिटरवरून ९९.५१ रुपये प्रति लिटर झाले आहेत, तर डिझेलचे दर ९१ पैशांनी वाढून ९१.५८ रुपयांवरून ९२.४९ रुपये प्रति लिटर झाले आहेत.
मागील काही दिवसापासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे होर्मुझचा मार्ग पूर्ण बंद आहे. याचा फटका आता जगभरातील अनेक देशांना बसण्यास सुरूवात झाली आहे, भारतातही इंधनाचा तुटवडा असल्याचे दिसत आहे. तर जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत.
















