31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रदहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर : प्रतिनिधी
राज्य महामंडळाच्या सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणा-या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जोमाने सुरू असून परीक्षेसाठी सज्ज होत आहेत.

अशातच नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभ्यासाच्या तणावातून एका दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. मृत मुलीचे नाव रुद्राईनी दीपक शेलकरी असे आहे. या घटनेनंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन विद्यार्थिनी रुद्राईनी दीपक शेलकरी (वय १६) ही नागपूरमधील विवेकानंद नगरमध्ये राहायची. ती नागपूरमधील वडधामना येथील कारमेल अकॅडमी शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. काल दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधून तिने गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. हा प्रकार तिच्या लहान भावाच्या लक्षात येताच त्याने कुटुंबाला याबाबत कळवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR