१० हजारांच्या कर्जासाठी शेतक-याचा घेतला जीव!

खासगी फायनान्स कंपनीची मुजोरी, कार्यालयात आढळला मृतदेह

नांदेडमध्ये नातेवाईकांच्या
आरोपांमुळे खळबळ
नांदेड : प्रतिनिधी
कर्जाचा डोंगर, दुष्काळ आणि कुटुंबाच्या उदरनिवार्हाची चिंता अशा परिस्थितीत एका अल्पभूधारक शेतक-याचा शहरातील खाजगी फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली. शेतक-याने खाजगी फायनान्सकडून केवळ १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जवसुलीसाठी त्यांना गावातून नांदेडला आणल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून, फायनान्स चालकानेच त्यांची हत्या केल्याचा संशयही व्यक्त केला.

ही घटना नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरातील चिखलवाडी रोडवरील खालसा फायनान्सच्या कार्यालयात घडली. माळकौठा (ता. मुदखेड) येथील चंद्रकांत शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुली व दोन मुलगे आहेत. शेतीतून मिळणा-या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणी वाढल्याने त्यांना खाजगी फायनान्सकडून कर्ज घ्यावे लागले.

शिंदे यांनी मागील महिन्यात १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, व्याजाच्या नावाखाली रक्कम कापून त्यांच्या हातात केवळ सात हजार रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. याच कारणावरून त्यांच्यावर कर्जवसुलीसाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

कर्जाच्या वसुलीसाठी गुरुवारी फायनान्सशी संबंधित व्यक्तींनी चंद्रकांत शिंदे यांना माळकौठा येथून नांदेडमधील कार्यालयात आणल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यांच्याकडे ७० हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे. शिंदे यांना कार्यालयात आणल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांना ते एक-दोन दिवसांत परत येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. शुक्रवारी खालसा फायनान्सच्या कार्यालयात शिंदे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बातमी समजताच कुटुंबीय आणि नातेवाईक आक्रोश करत घटनास्थळी दाखल झाले.

फायनान्सच्या मालकाने
माझ्या मुलाचा केला खून
आपल्या मुलाचा फायनान्सच्या मालकाने खून केला, असा आरोप मयत शिंदे यांच्या आईने केला तर मुलीने सांगितले की, आपल्या वडिलाने ७ हजाराचे कर्ज घेतले. मात्र एका महिन्यात ७० हजारांची मागणी करण्यात आली. यासाठी आपल्या वडिलांना जबर मारहाण करून खून केला, असा आरोप केला.

फायनान्स चालक पसार
चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूमागे कर्जवसुलीसाठी आणलेला दबाव कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. फायनान्स चालकाने त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. या घटनेनंतर खालसा फायनान्सचा चालक पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आठवड्याभरात दुस-या
शेतक-याची आत्महत्या
अवघ्या काही दिवसांपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, असा व्हीडीओ करून बोरगाव येथील एका शेतक-याने गळफास घेतला. यानंतर माळकौठा येथील या शेतक-याने थेट फायनान्सच्या कार्यालयातच आपली जीवनयात्रा संपविली. केवळ १० हजारांच्या कर्जासाठी एका शेतक-याचा जीव गेल्याने खाजगी सावकारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

फायनान्सच्या तगाद्याने
परभणीतही आत्महत्या
फायनान्सरच्या जाचामुळे नांदेडमधील ४० वर्षीय शेतक-याने जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मायक्रो फायनान्सच्या कर्जाला कंटाळून एका ३२ वर्षीय तरुण शेतक-याने शेतात गळ््याला दोर लावून आत्महत्या केली. लहू लाडाने असे मृत शेतक-याचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानवत तालुक्यातील केकरजवळा शिवारात लिंबाच्या झाडाला लहू लाडाने यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अवघ्या ३२ व्या वर्षी तरुण शेतक-याने टोकाचे पाऊल उचलल्याने लाडाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news