सुरक्षिततेच्या दृष्टीने १ तासानंतर व्यवहार पूर्ण होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजीटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नवा नियम लागू करण्याची शक्यता आहे. नव्या नियमानुसार यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी १ तासांचा वेळ लागू शकतो. डिजीटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आरबीआय १० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय किंवा डिजीटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी १ तासांची वाट पाहावी लागेल.
आरबीआयच्या प्रस्तावानुसार एखादा व्यक्ती १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम अकाऊंट टू अकाऊंट वर्ग करणार असेल तर बँक तो व्यवहार तातडीने पूर्ण करण्याऐवजी १ तासांचा वेळ घेईल. या दरम्यान ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची संधी मिळू शकते. देशात डिजिटल फसवणुकीचे गुन्हे वेगाने वाढलेले आहेत. आकडेवारीनुसार २०२१ मध्ये डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या २.६ लाख इतकी होती. २०२५ मध्ये ती वाढून २८ लाख झाली आहे. २०२१ मध्ये डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणातील संख्या ५५१ कोटी रुपये होती ती वाढून २२०३१ कोटी रुपये झाली आहे.
डिजिटल फसवणूक
रोखणे शक्य होणार
आरबीआयच्या मते फसवणुकीचे प्रकार तांत्रिक नसतात. फसवणूक करणारे लोक फोन कॉल किंवा मेसेज करून भीती दाखवून किंवा आमिष दाखवून स्वत:च्या खात्यात पैसे वर्ग करून घेतात. दरम्यानच्या काळात थोडा वेळ देण्यात आल्यास लोक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात. म्हणजे आणि डिजीटल फसवणूक प्रकार रोखले जाऊ शकतात.
















