चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चापोलीत ते नायगाव फॉर्म हाऊसलगत असलेल्या शेतात ११ लाख ७० हजार रुपयांच्या किंमतीच्या चंदनाच्या झाडाचा ऐवज पोलिसानी ताब्यात घेतला असून ४ आरोपी विरूध्द चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
दि ३ नोव्हेबंर रोजी वाजण्यांच्या सुमारास चापोली ते नायगाव जाणारे रोडवरील फार्म हाऊस लगत असलेल्या शेतात आनंदवाडी शेत शिवारात आरोपी नरसिंग रामा बंदराळे वय-५० वर्षे, रा. आनंदवाडी, ता. चाकूर आणि इतर वसंत भानुदास चांनकाणे, वय ४० वर्षे, संतोष वैजनाथ चांनकाणे, वय ३५ वर्षे व बालाजी भानुदास चांनकाणे, वय ४२ वर्षे रा. वाढवणा, ता.उदगीर, जि. लातूर यांच्याकडून शासनाने प्रतिबंधीत व संरक्षित केलेल्या चंदन वृक्षांची चोरून तोडणी करून लाकडाची साल काडून चंदनाचा गाभा व लाकडे भरलेले पोते व त्या करीता वापरण्यात आलेली अवजारे असा एकूण ११ लाख ७० हजार रुपयांच्या किंमतीचा माल मिळून आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अनिल व्यंकटराव श्रीरामे, वय ३५ वर्षे, (पो.कॉ. ८३२ ) यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि जी.एन.चामले हे करीत आहेत.
फोटो १८
















