16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्र१३ नगर परिषदांची निवडणूक लांबणीवर

१३ नगर परिषदांची निवडणूक लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४१नगरपंचायतींची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. त्यानंतर दुस-याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आणि प्रचाराला एक दिवस (१ डिसेंबर, रात्री १० वाजेपर्यंत) शिल्लक असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल १३ नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे या नगर परिषदांमध्ये अस्वस्थता आहे.

कारण पुन्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा नव्याने प्रचार करावा लागेल, पुन्हा खर्च करावा लागेल, नव्याने सभांचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे उमेदवारांच्या पोटात आताच गोळा आला आहे. लांबणीवर गेलेल्या नगर परिषदांमध्ये अजित पवार यांच्या तालुक्यातील बारामती नगर परिषदेचाही समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाने बारामतीसह महाबळेश्वर आणि फलटण नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया अनुक्रमे २० आणि २१ डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. यासाठी जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी ८ दिवसांची वेळ मागून घेतली आहे.

दुसरीकडे बारामती नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, ही प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद करण्यात आली होती. शिवाय, उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत असलेल्या त्रुटींवर काहींनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह ७ प्रभागांमधील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे त्याची अपिलाची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.

उर्वरित १० नगर परिषदा
बारामती आणि महाबळेश्वर यांच्या व्यतिरिक्त आणखी सात नगर परिषदांच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत. यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी (चारही अहिल्यानगर जिल्हा), मंगळवेढा (सोलापूर जिल्हा), बाळापूर, घुग्गूस (चंद्रपूर), अंजनगाव सुर्जी, मुखेड, धर्माबाद या नगर परिषदांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR